विभागीय आयुक्तालयात ध्वजारोहण व मानवंदना

अमरावती, दि. 26 : भारतीय प्रजासत्ताकाच्या 74 व्या वर्धापन दिनोत्सवानिमित्त विभागीय आयुक्तालयात आज विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन तिरंग्यास मानवंदना देण्यात आली. विभागीय आयुक्तांनी उपस्थित सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा यावेळी दिल्या.

राष्ट्रध्वज वंदन, राष्ट्रगीत व राज्यगीतानंतर पोलीस पथकाव्दारे तिरंग्यास मानवंदना देण्यात आली.

यावेळी उपायुक्त (साप्रवि) संजय पवार, उपायुक्त (पुरवठा) रमेश आडे, उपायुक्त (विकास) राजीव फडके, उपायुक्त (नियोजन) हर्षद चौधरी, सहाय्यक आयुक्त श्यामकांत मस्के, वैशाली पाथरे, तहसीलदार संतोष काकडे, संतोष डोईफोडे, विशेष कार्य अधिकारी सुशील आग्रेकर यांच्यासह अन्य अधिकारी-कर्मचारी आदी यावेळी उपस्थित होते.

000

 

भारतीय प्रजासत्ताकाचा ७५ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा

मुख्य सोहळ्यात ध्वजारोहण करुन तिरंग्यास मानवंदना दिली. यावेळी विभागीय आयुक्त यांनी उपस्थित सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

जगातील सर्वात मोठी व यशस्वी लोकशाही म्हणून भारताचा जगभर गौरव होतो. ही संविधानाची ताकद आहे आणि येथील नागरिकांच्या सौहार्द, सहिष्णूता व बंधुभावाचे ते गमक आहे. नागरिक म्हणून आपले कर्तव्य पाळून ही लोकशाही अधिकाधिक बळकट करण्याचा संकल्प आपण सर्वांनी प्रजासत्ताकदिनानिमित्त करूया, असे आवाहन विभागीय आयुक्त श्रीमती पांडेय यांनी यावेळी केले.

जिल्हाधिकारी सौरभ कटियार, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, पोलीस अधीक्षक विशाल आनंद सिंगुरी, राज्य राखीव पोलीस दलाचे समादेशक राकेश कलासागर, मनपा आयुक्त देविदास पवार आदी यावेळी उपस्थित होते.

राष्ट्रध्वज वंदन, राष्ट्रगीत व राज्यगीत यावेळी सादर करण्यात आले. विभागीय आयुक्तांनी मैदानावर जीपमधून फेरी मारून पोलीस, विविध सुरक्षा दल व विभागाच्या पथकांचे निरीक्षण केले. त्यांच्या हस्ते विविध गुणवंत अधिकारी व कर्मचाऱ्यांना यावेळी गौरविण्यात आले.

मुख्य समारंभ स्थळी अतिथींच्या हस्ते पुरस्कारार्थींना पुरस्कृत करण्यात आले. यामध्ये पोलीस अंमलदार प्रवीण दादाराव आखरे यांनी पोलीस जलतरण केंद्र येथे पाण्यात उभे राहण्याच्या उपक्रमाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आले. माजी जिल्हा समादेशक सरदारसिंग शर्मा, जिल्हा मार्गदर्शक हरीश ढाकुलकर, जिल्हा आरएसपी अधिकारी आनंद मधुकर महाजन, जिल्हा समादेशक सागरसिंह प्रतापसिंह कनकुरे यांना वाहतूक सुरक्षेबाबत युवकांमध्ये जनजागृती निर्माण करुन मार्गदर्शन करीत असल्याबाबत सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. होमगार्ड जिल्हा प्रशिक्षण केंद्राचे नायक अजय भाऊरावजी आसोले यांना आपत्ती व्यवस्थापनामध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबाबत सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. सैनिक कल्याण विभागामार्फत सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनामध्ये केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल जिल्हाधिकारी सौरभ कटियार तसेच जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बीजवल यांना सन्मानित करण्यात आले. अमरावती जिल्हांतर्गत नगर परिषद अंजगाव सुर्जी तथा इतर नगर परिषद, नगरपंचायत कार्यक्षेत्रात वेळोवेळी उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये उल्लेखनीय कामगिरीबद्दल अंजगाव सुर्जी नगरपरिषदेचे अग्नीशमन अधिकारी संदेश विश्वनाथ जोगदंड यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच दंत चिकित्सक डॉ. सैय्यद अबरार ग्रामीण व शहरी भागातील गरजू व गोरगरीब नागरिकांना माफक दरात दंत वैद्यकीय सेवा पुरवितात. त्यांच्या या समाजकार्याचा सन्मान म्हणून सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमातील परेडचे पथसंचलन पोलीस उपविभागीय अधिकारी परेड कमांडर डॉ. निलेश पांडे यांनी केले. पथ संचालनालयामध्ये नक्षलग्रस्त भागामध्ये कायदा व सुव्यवस्था राखणाऱ्या राज्य राखीव पोलीस बल गट, पोलीस आयुक्त अमरावती शहर पोलीस पथक, पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण पोलीस पथक, अमरावती शहर व ग्रामीण महिला तक्रार निवारण पथक, पोलीसांना बंदोबस्तात सहकार्य करणारे गृहरक्षक दल पुरुष, शहर वाहतूक पथक, गृहरक्षक महिला दल, एनसीसी युनिट पथक, महिला आर्थिक विकास महामंडळाचा महिला सक्षमीकरणावरील तसेच महिला बाल विकास विभागाचा चित्ररथ, जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक विभागाचा चित्ररथ, परिवहन महामंडळाचा चित्ररथ यासह स्कुल ऑफ स्कॉलर्स स्काऊट पथक, तखतमल इंग्लिश स्कुल, दीपा इंग्लिश प्रायमरी स्कुल, जिप गर्ल व बॉईज हायस्कुल, होलीक्रॉस मराठी प्रायमरी स्कुल, आरएससी अस्मिता विद्यालय (गर्ल्स), होलीक्रॉस गर्ल्स हायस्कुल, एसआरपीएफ बँड पथक, डायल 112 वाहन, जलद प्रतिसाद पथक, मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन, अग्नीशमक वाहन, दंगा नियंत्रण वज्र वाहन, वरुण वाहन पथक यांनी पथमार्गावर संचलन केले.

कार्यक्रमामध्ये एकूण 15 प्लाटुन होते. यामध्ये 203 कर्मचारी, 189 विद्यार्थी सहभागी होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन देशमुख यांनी केले.  यावेळी लोकप्रतिनिधी, जेष्ठ सेनानी, वीरमाता, पिता, पत्नी तसेच त्यांचा आप्त परिवार, विविध क्षेत्रांतील मान्यवर, महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक व विद्यार्थी अधिकारी तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *