भूजल समृद्ध ग्राम स्पर्धा सन २०२२-२३ चे जिल्हास्तरीय निकाल जाहीर  

मुंबई, दि. 24 : भूजल समृद्ध ग्राम स्पर्धा 2022-23चे ग्रामपंचायत निहाय जिल्हास्तरीय निकाल जाहीर करण्यात आले असल्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या अटल भूजल योजनेचे सहसंचालक तथा प्रकल्प समन्वयक डॉ. प्रवीण कथने यांनी कळविले आहे.

लोकसहभागाद्वारे भूजलाचे संनियंत्रण करणे, जलसुरक्षा आराखडा तयार करणे व त्यामध्ये समाविष्ट कामांची अंमलबजावणी करणे, राज्य व केंद्र पुरस्कृत योजनांचे अभिसरण होणे, यासाठी ग्रामस्तरावर सुदृढ वातावरण निर्मितीसाठी अटल भूजल योजनेंतर्गत भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

भूजलाच्या अनियंत्रित उपशामुळे भूजल पातळीत होत असलेली घसरण व बाधित होत असलेली गुणवत्ता थांबवण्यासाठी मागणी व पुरवठा व्यवस्थापन प्रणालीच्या प्रभावी अंमलबजावणीद्वारे सहभागीय भूजल व्यवस्थापन अधिकाधिक सशक्त करण्यासाठी केंद्र शासन व जागतिक बॅंक अर्थसहाय्यीत अटल भूजल योजना 26 नोव्हेंबर,2020 पासून महाराष्ट्रातील 13 जिल्ह्यातील 43 तालुक्यामधील 1133 ग्रामपंचायतींमध्ये सुरु आहे. लोकसहभागातून भूजल व्यवस्थापन करणे हा योजनेचा गाभा आहे. त्याकरीता ग्रामस्तरावर जलअंदाजपत्रक तयार करणे, भूजल उपलब्धतेतील तूट भरुन काढण्यासाठी अस्तित्वातील राज्य व केंद्र पुरस्कृत योजनांचे अधिकाधिक अभिसरण करणे व ग्रामस्तरावरील भूजल उपलब्धतेत शाश्वतता साध्य करणे, हे योजनेचे उद्दिष्ट आहे.

अटल भूजल योजनेच्या अंमलबजावणीमध्ये योजनेत समाविष्ट ग्रामपंचायतीमधील अधिकाधिक लोकांनी सहभागी व्हावे व सर्वांनी गावातील भूजल व्यवस्था शाश्वत राखण्याकरीता मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवावा यासाठी गावा – गावांमध्ये निकोप स्पर्धा निर्माण होण्याच्या दृष्टीने व अटल भूजल योजनेचे मुख्य उद्दिष्ट “लोकसहभागातून भूजल व्यवस्थापन” साध्य होण्यासाठी राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातर्फे अटल भूजल योजनेंतर्गत भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. अटल भूजल योजनेंतर्गत उत्कृष्ट लोकसहभाग नोंदविणाऱ्या व काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना सन 2022-23 व 2023-24 या दोन आर्थिक वर्षांसाठी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

स्पर्धेमधील ठळक बाबी पुढीलप्रमाणे – सन 2022-23 मध्ये महाराष्ट्रातील योजनेत समाविष्ट पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, नाशिक, अहमदनगर, जळगाव, जालना, लातूर, धाराशीव, बुलढाणा, अमरावती, नागपूर या 12 जिल्ह्यातील 270 ग्रामपंचायतींनी स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. एकूण 550 गुणांसाठी स्पर्धा घेण्यात आली.

स्पर्धेचे मूल्यांकन उपविभागस्तर, जिल्हास्तर व राज्यस्तर या तीनस्तरावर करण्यात आले. उपविभागीय समिती -उपविभागीय अधिकारी (महसूल) अध्यक्ष व इतर सदस्य, जिल्हास्तरीय समिती –  ‍जिल्हाधिकारी अध्यक्ष व इतर सदस्य आणि राज्यस्तरीय  समिती – प्रधान सचिव, पाणीपुरवठा  व स्वच्छता विभाग अध्यक्ष व इतर सदस्य.

पुरस्काराचे स्वरुप:

राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार हा 1 कोटी रुपयांचा राज्यस्तरीय द्वितीय पुरस्काराची रक्कम 50 लाख असून तृतीय पुरस्कार 30 लाख रुपयांचा आहे. तर जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकास 50 लाख रुपये, द्वितीय क्रमांकास 30 लाख व तृतीय क्रमांकास 20 लाखांचे पारितोषिक आहे. ग्रामपंचायतींना राज्य व जिल्हास्तरीय पुरस्काराची रक्कम अटल भूजल योजनेंतर्गत राज्यास प्राप्त होणाऱ्या प्रोत्साहन निधीमधून अदा केली जाणार आहे.

सन 2022-23 साठी घेण्यात आलेल्या भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेचा जिल्हास्तरीय निकाल पुढीलप्रमाणे –

 भूजल समृद्ध ग्राम स्पर्धा 2022-23

 जिल्हास्तरावरील प्रथमद्वितीय  तृतीय क्रमांक प्राप्त ग्रामपंचायतींची यादी 

 

अ. क्र.
जिल्हा
तालुका
ग्रामपंचायत
क्रमांक
बक्षिसाची रक्कम

1
पुणे
बारामती
काऱ्हाटी
प्रथम
50 लाख

2
पुरंदर
सोनोरी
द्वितीय
30 लाख

3
पुरंदर
चांबळी
तृतीय
20 लाख

4
सातारा
माण
किरकसाल
प्रथम
50 लाख

5
खटाव
निढळ
द्वितीय
30 लाख

6
खटाव
मांडवे
तृतीय
20 लाख

7
सांगली
कवठेमहांकाळ
नांगोळे
प्रथम
50 लाख

8
कवठेमहांकाळ
बोरगाव
द्वितीय
30 लाख

9
तासगाव
वडगाव
तृतीय
20 लाख

10
सोलापूर
माढा
भेंड
प्रथम
50 लाख

11
माढा
लोंढेवाडी
द्वितीय
30 लाख

12
माढा
सोलंकरवाडी
तृतीय
20 लाख

13
नाशिक
सिन्नर
वडगाव पिंगळा
प्रथम
50 लाख

14
सिन्नर
दातली
द्वितीय
30 लाख

15
देवळा
कनकापूर
तृतीय
20 लाख

16
जळगाव
रावेर
सावखेडे बु.
प्रथम
50 लाख

17
पारोळा
उंदिरखेडे
द्वितीय
30 लाख

18
रावेर
खिरोदा प्र. यावल
तृतीय
20 लाख

19
जालना
परतूर
आंबा
प्रथम
50 लाख

20
घनसावंगी
बोररांजणी
द्वितीय
30 लाख

21
घनसावंगी
हातडी
तृतीय
20 लाख

22
लातूर
लातूर
हरंगुळ बु.
प्रथम
50 लाख

23
निलंगा
जाजनूर
द्वितीय
30 लाख

24
चाकूर
वडवळ ना.
तृतीय
20 लाख

25
उस्मानाबाद
उस्मानाबाद
खेड
प्रथम
50 लाख

26
उस्मानाबाद
खामसवाडी
द्वितीय
30 लाख

27
उमरगा
भगतवाडी
तृतीय
20 लाख

28
अमरावती
वरुड
जरुड
प्रथम
50 लाख

29
वरुड
झटामझरी
द्वितीय
30 लाख

30
मोर्शी
अंबाडा
तृतीय
20 लाख

31
बुलढाणा
मोताळा
निपाणा
प्रथम
50 लाख

32
मोताळा
शेलगाव बाजार
द्वितीय
30 लाख

33
मोताळा
वरुड
तृतीय
20 लाख

34
नागपूर
नरखेड
खेडी गोवारगोंदी
प्रथम
50 लाख

35
काटोल
खुर्सापार
द्वितीय
30 लाख

36
काटोल
डोर्ली भांडवरकर
तृतीय
20 लाख

०००

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *