नवी दिल्ली, दि. १२: ९८ वे अ.भा. मराठी साहित्य संमेलन 21 ते 23 फेब्रुवारी दरम्यान नवी दिल्ली येथील तालकटोरा स्टेडियमवर होत आहे. त्याअनुषंगाने मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी साहित्य संमेलनाच्या स्थळाची पाहणी केली. त्यानंतर साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.
यावेळी खासदार नरेश मस्के साहित्य संमेलनाचे निमंत्रक सरहद संस्थेचे संस्थापक संजय नहार आणि समन्वयक डॉ. शैलेश पगारिया उपस्थित होते.
भेटीनंतर माध्यमांशी बोलताना मंत्री सामंत म्हणाले की, राज्याचा मराठी भाषेचा मंत्री म्हणून दिल्लीमध्ये होणाऱ्या मराठी अखील भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आढावा घेण्यासाठी आज दिवसभर राजधानीत असून या संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्घाटक आहे. या सर्व नियोजनाच्या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यासाठी आज पवार यांची भेट घेतल्याचे सांगितले.
०००
The post मंत्री उदय सामंत यांनी घेतली स्वागताध्यक्ष शरद पवार यांची भेट first appeared on महासंवाद.