सोलापूर, दिनांक 30:- नियोजन भवन इमारतीमधील पहिल्या मजल्यावर पालकमंत्री यांच्यासाठी कार्यालय तयार करण्यात आलेले असून या कार्यालयाचे उद्घाटन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आज फित कापून केले. यावेळी त्यांनी कार्यालयाची पाहणीही केली.
यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, आमदार सर्वश्री सुभाष देशमुख, समाधान आवताडे, सचिन कल्याणशेट्टी, महापालिका आयुक्त शितल उगले तेली, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्र्यांची जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट व पाहणी
राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्हा नियोजन समितीची बैठक झाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट दिली व कार्यालयाची सविस्तर पाहणी केली.
पालकमंत्री झाल्यानंतर प्रथमच श्री गोरे यांनी आज प्रथमच जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट दिली. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाची रचना सांगून प्रत्येक शाखेच्या अधिकाऱ्याची व त्याच्या कामकाजाची माहिती पालकमंत्री महोदयांना दिली. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात आल्यानंतर अभ्यागतासाठी स्वतंत्र अभ्यागत कक्ष तयार करण्यात आलेला असून त्या कक्षाची ही पाहणी पालकमंत्री यांनी केली.
यावेळी महापालिका आयुक्त शितल उगले तेली, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख तहसीलदार श्रीकांत पाटील व अन्य महसूल अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
The post पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते नियोजन भवन येथील पालकमंत्री कार्यालयाचे उद्घाटन first appeared on महासंवाद.