नवी दिल्ली, ३० : देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ 2 मिनिटे मौन (स्तब्धता) पाळून आज महाराष्ट्र सदनात तसेच महाराष्ट्र परिचय केंद्रात हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त निवा जैन, सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार, स्मिता शेलार व्यवस्थापक भागवंती मेश्राम यांच्यासह सदनातील अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.
महाराष्ट्र परिचय केंद्रात हुतात्म्यांना आदरांजली
महाराष्ट्र परिचय केंद्रात हुतात्म्यांना मौन पाळून आदराजंली वाहण्यात आली. यावेळी उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा यांच्यासह माहिती अधिकारी अंजु निमसरकर, पत्रकार निलेश कुलकर्णी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
००००
The post राजधानीत हुतात्म्यांना आदरांजली first appeared on महासंवाद.