मुंबई, दि. १२ : महाराष्ट्र राज्य लॉटरीतर्फे प्रत्येक महिन्यात पाच मासिक तसेच साप्ताहिक सोडती काढल्या जातात.नोव्हेंबर २०२४ मध्ये मासिक व भव्यतम सोडतीतून २८,९९२ तिकिटांना ३ कोटी २६ लाख ७० हजार ८५० रुपये व साप्ताहिक सोडतीतून ५६,७४१ तिकीटांना रू. दोन कोटी ३१ लाख ६३ हजार ९०० ची बक्षिसे जाहीर झाली आहेत, असे महाराष्ट्र राज्य लॉटरी वाशी येथील वित्त व लेखा विभागाचे उपसंचालक यांनी कळविले आहे.
१ नोव्हेंबर, २०२४ रोजी महाराष्ट्र सह्याद्री, २ नोव्हेंबर, २०१४ रोजी महाराष्ट्र तेजस्विनी, ६ नोव्हेंबर, २०२४ रोजी महाराष्ट्र गणेशलक्ष्मी दिवाळी विशेष, १२ डिसेंबर, २०२४ रोजी महाराष्ट्र दिवाळी भव्यतम, १९ डिसेंबर २०२४ रोजी महाराष्ट्र गजराज व दि. २०/११/२०२४ रोजी महाराष्ट्र गौरव या मासिक सोडती दुपारी ४.०० वाजता काढण्यात आल्या आहेत.
या तिकिटांना लॉटरी जाहीर
महाराष्ट्र सह्याद्री मालिका तिकीट क्रमांक MS-2411D/43098 या चिराग एन्टरप्रायझेस, नाशिक यांचेकडून विक्री झालेल्या तिकीटास रक्कम रू. ११ लाखाचे प्रथम क्रमांकाचे एक बक्षिस जाहीर झाले आहे.
महाराष्ट्र गणेशलक्ष्मी दिवाळी विशेष मालिका तिकीट क्रमांक GS-०६-३८६२ या महाराजा लॉटरी सेंटर, इचलकरंजी यांचेकडून विक्री झालेल्या तिकीटास रक्कम रू. २२ लाखाचे प्रथम क्रमांकाचे एक बक्षिस जाहीर झाले आहे.
महाराष्ट्र दिवाळी भव्यतम सोडत तिकीट क्रमांक DI-05 / 38465 या न्यू जय अंबे लॉटरी भंडार, यवतमाळ यांचेकडून विक्री झालेल्या तिकीटास रक्कम रू. एक कोटीचे प्रथम क्रमांकाचे एक बक्षिस जाहीर झाले आहे.
महाराष्ट्र गजराज तिकीट क्रमांक GJ 24/7136 या न्यू जय अंबे लॉटरी भंडार, यवतमाळ यांच्याकडून विक्री झालेल्या तिकीटास रक्कम रू.14 लाखाचे प्रथम क्रमांकाचे बक्षिस जाहीर झाले आहे.
महाराष्ट्र गौरव तिकिट क्रमांक G13/5771 या भारत लॉटरी, कोल्हापूर यांचेकडून विक्री झालेल्या तिकिटास रक्कम रु.35 लाखाचे प्रथम क्रमांकाचे बक्षिस जाहिर झाले आहे.
महा. सागरलक्ष्मी ते महाराष्ट्रलक्ष्मी या साप्ताहिक सोडतीमधून रक्कम रू. सात लाखाचे प्रथम क्रमांकाची एकूण 10 बक्षिसे जाहीर झाली आहेत.
सर्व खरेदीदारांनी महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या वेबसाईटवर नमूद प्रक्रिया पूर्ण करून रक्कम. दहा हजारावरील वरील बक्षिसाची मागणी या कार्यालयाकडे सादर करावी. रक्कम रू. दहा हजाराच्या आतील बक्षिस रकमेची मागणी विक्रेत्यांकडून करण्यात यावी, असे महाराष्ट्र राज्य लॉटरी वाशी येथील वित्त व लेखा विभागाचे उपसंचालक यांनी कळविले आहे.
०००
मोहिनी राणे/ससं/