नवी दिल्ली, 31 : देशाचे माजी उपप्रधानमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आणि देशाच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या स्मृतीदिनी त्यांना महाराष्ट्र सदनात अभिवादन करण्यात आले. यावेळी निवासी आयुक्त आणि प्रधान सचिव रुपिंदर सिंग यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली अर्पण केली.
कॉपर्निकस मार्गावरील महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमास सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार, स्मिता शेलार आणि महाराष्ट्र सदनातील अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती ‘राष्ट्रीय एकता दिवस’ म्हणून आणि इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी ‘राष्ट्रीय संकल्प दिवस’ म्हणून पाळण्यात येते. यावेळी निवासी आयुक्त रुपिंदर सिंग यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना राष्ट्राची एकात्मता, अखंडता आणि सुरक्षा अबाधित राखण्याची शपथ दिली. याचप्रमाणे महाराष्ट्र परिचय केंद्रात देशाचे प्रथम गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल आणि पहिल्या महिला प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांना अभिवादन करण्यात आले.
००००
The post राजधानीत सरदार वल्लभभाई पटेल आणि इंदिरा गांधी यांना अभिवादन first appeared on महासंवाद.