धनगर बेडा येथील समाज बांधवांशी मेघालयाचे राज्यपाल चंद्रशेखर एच. विजयशंकर यांचा संवाद

अमरावती दि. १९ (जिमाका) : मेघालयाचे राज्यपाल चंद्रशेखर एच. विजयशंकर यांचे आज अमरावती विश्रामगृह येथे सकाळी आगमन झाले.  यावेळी त्यांना पोलीस विभागामार्फत सलामी देऊन मानवंदना देण्यात आली . पद्मश्री डॉ. विकास महात्मे, धनगर विकासमंचचे अध्यक्ष संतोष महात्मे, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, विभागीय उपायुक्त संजय पवार, महानगरपालिका आयुक्त सचिन कलंत्रे, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, वनविभागाचे उपवनसंरक्षक सुमंत सोळंके, सहायक वनसंरक्षक ज्ञानेश्वर देसाई, वनपरिक्षेत्र अधिकारी बी. आर. पवार तसेच चांदुर रेल्वेच्या उपविभागीय अधिकारी तेजस्विनी कोरे, तहसीलदार पूजा माटोडे, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

त्यानंतर राज्यपाल श्री. विजयशंकर त्यांनी  चांदुर रेल्वे तालुक्यातील धनगर बेडा येथे भेट दिली. यावेळी धनगर समाज बांधवांचे दैवत श्री. खंडोबा यांच्या ध्वजाचे पूजन करण्यात आले. धनगर बेडा समाज बांधवांनी राज्यपाल श्री. विजयाशंकर यांचा पारंपरिक पद्धतीने घोंगडी श्रीफळ देवून सत्कार केला . तसेच स्त्री-पुरुषांनी पारंपारिक नृत्य यावेळी सादर केले. राज्यपाल श्री. विजयाशंकर धनगर समाज बांधवांशी संवाद साधला.

भटकंती करणाऱ्या समाज बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. बेड्यावरील बांधवांनी आपल्या समस्या मांडण्यासाठी निवडक प्रतिनिधींसह सुनियोजित दिवशी मुंबई येथील राजभवन येथे यावे .मी तेथे महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या समोर आपल्या समस्यांबाबत सविस्तर चर्चा करू. तुमच्या समस्यांचे निराकरण करण्याचे मी निश्चित प्रयत्न करेल. पाड्यावरील सर्व बांधवांना शासकीय योजनेअंतर्गत घर बांधणे, पाड्यांपर्यंत रस्ते बांधकाम, शिक्षण व्यवस्था, आरोग्य व्यवस्था तसेच आवश्यक सर्व सुविधा पुरविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू. वन विभागामार्फत धनगर समाज बांधवांना सहकार्य मिळेल. तसेच पाड्यावर  राहणाऱ्यांचे आधार कार्ड, पॅन कार्ड अशी शासकीय कागदपत्रे तयार करण्यावर भर दिला जाईल, असा विश्वास राज्यपाल श्री. विजयशंकर यांनी यावेळी व्यक्त केला. कार्यक्रमानंतर राज्यपाल यांनी  नागपूरकडे  प्रयाण केले .

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *