मुंबई, दि. 21 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ‘महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी निवडणूक यंत्रणा सज्ज’ याविषयी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.
राज्यात 15 ऑक्टोबर 2024 पासून विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 चा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या कालावधीत आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी, निवडणुकीचे कामकाज पार पडण्यासाठी सुरू असलेली कार्यवाही, मतदान केंद्र व मतमोजणी केंद्रांवर करण्यात आलेली तयारी, मतदार जनजागृती उपक्रम, कायदा व सुव्यवस्था, माध्यम प्रमाणीकरण समितीचे कामकाज, सर्व घटकातील मतदारांसाठी केलेल्या सोयीसुविधा याबाबत श्री. एस. चोक्कलिंगम यांनी ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून माहिती दिली आहे.
‘जय महाराष्ट्र‘ कार्यक्रमात श्री. चोक्कलिंगम यांच्या मुलाखतीचा पहिला भाग मंगळवार दि. 22 ऑक्टोबर 2024 रोजी तसेच दुसरा भाग मंगळवार दि. 29 ऑक्टोबर 2024 रोजी रात्री 8.00 वा. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार आहे. तसेच महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ही मुलाखत ऐकता येणार आहे. तर ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखत बुधवार दि. 23, गुरूवार दि. 24, शुक्रवार दि. 25 आणि शनिवार दि. 26 ऑक्टोबर 2024 रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार प्रसाद मोकाशी यांनी ही मुलाखत घेतली आहे.
महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक
एक्स – https://twitter.com/MahaDGIPR
फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR
यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
0000
The post मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांची ‘दिलखुलास’, ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मुलाखत first appeared on महासंवाद.