मुंबई, दि. ९ : मालदीवचे राष्ट्राध्यक्ष एच.ई.डी.मोहम्मद मुईज्जू यांचे शिष्टमंडळासमवेत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून भारतीय वायू सेनेच्या विमानाने प्रयाण झाले.
मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पुष्पगुच्छ देऊन यावेळी निरोप दिला. मालदीवमधील भारतीय उच्चायुक्त मुनु महावर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, अतिरिक्त पोलिस महासंचालक चिरंजीव प्रसाद, सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिव अंशू सिन्हा, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, प्रादेशिक पासपोर्ट अधिकारी राजेश गावंडे तसेच पोलीस दलाचे व राजशिष्टाचार विभागाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
The post मालदीवचे राष्ट्राध्यक्ष एच.ई.डी.मोहम्मद मुईज्जू यांचे मुंबई येथून प्रयाण first appeared on महासंवाद.