मुंबई, दि. 8 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र‘ कार्यक्रमात ‘शाश्वत पर्यावरण विकास परिषद‘ या विषयाच्या अनुषंगाने राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष तथा मुख्यमंत्री पर्यावरण व शाश्वत विकास कृती समितीचे कार्यकारी अध्यक्ष पाशा पटेल यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.
वातावरणीय बदलाच्या संकटाला तोंड देवून शाश्वत विकास साधण्यासाठी शासनस्तरावर धोरणात्मक पावले उचलण्यात आली आहेत. मोठ्या प्रमाणात बांबू लागवडीस शेतकऱ्यांना प्रोत्साहन देवून जिवाश्म इंधनाला पर्याय म्हणून बांबूचा वापर करण्यावर भर देण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ‘पर्यावरण व शाश्वत विकास टास्क फोर्स‘ देखील गठीत करण्यात आला आहे. राज्यात पर्यावरण रक्षण, शाश्वत विकास आणि हरित महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या कामाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे. यासाठी जागतिक कृषी परिषदेच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा 20 देशातील प्रतिनिधींच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला. हा उपक्रम तसेच राज्यभरात त्याची अंमलबजावणी याबाबतची माहिती ‘जय महाराष्ट्र‘ कार्यक्रमात राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष श्री. पटेल यांनी दिली आहे.
‘जय महाराष्ट्र‘ कार्यक्रमात ही मुलाखत बुधवार दि. 9 ऑक्टोबर 2024 रोजी रात्री 8.00 वा. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार असून महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ही मुलाखत ऐकता येणार आहे. ज्येष्ठ पत्रकार विजय गायकवाड यांनी ही मुलाखत घेतली आहे.
महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक
एक्स – https://twitter.com/MahaDGIPR
फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR
यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
०००००
The post ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांची उद्या विशेष मुलाखत first appeared on महासंवाद.