जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील २११ घरकुलांसाठी मिळाला भूखंड; जळगाव जिल्ह्यातला पहिला नावीन्यपूर्ण प्रकल्प, पालकमंत्र्यांनी केला आनंद व्यक्त

जळगाव दि. 25 ( जिमाका ) – जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील 211 घरकुलांना शक्ती समितीची बैठक घेन भूखंड देण्याबाबतचा निर्णय आज घेण्यात आला. या निर्णयामुळे अनेक गरिबांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू तरळणारा आहे. या गोष्टीचे आपल्याला आत्मिक समाधान असल्याची भावना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली. त्यांच्या समक्ष भूखंडाचे आदेश गरजुंना पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांच्या हस्ते देण्यात आले.

यावेळी जळगाव उपविभागीय अधिकारी विनय गोसावी, जळगाव तहसीलदार शितल राजपूत यांच्यासह विविध  विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

घरकुल मंजूर होऊनही बेघर गरजुना हक्काची जागा नव्हती. अशा बेघरांना हक्काचा निवारा उपलब्ध होणार असल्यामुळे आपल्याला समाधान असल्याचे सांगून  जळगाव मध्ये अशी पहिली कार्यवाही होत असल्याबद्दल पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हा प्रशासनाचे कौतुक केले.

यावेळी धरणगाव येथील 178 अतिक्रमित घरकुलांना नियमित करण्यात बाबत चर्चा झाली. त्यावरही लवकरच कार्यवाही करू असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. यावेळी गटविकास अधिकारी अमोल पाटील, ग्रा. प. सदस्य कैलास कोळी अंकुश मोरे, आकाश पाटील, फिरोज तडवी, ग्राम विकास अधिकारी जयपाल चिंचोरे यांच्यासह कुसुंबा व धरणगाव येथिल पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *