दिल्लीतील मराठी रसिकांसाठी २२ सप्टेंबरला कलगीतुरा नाटकाचे सादरीकरण

नवी दिल्ली 19 : नवी दिल्लीतील इंडियन हॅबिटॅट सेंटरच्या राष्ट्रीय स्तरावरील आयएचसी नाट्य महोत्सवात नाशिकमधील लोकप्रिय ‘कलगीतुरा’ या संगीत नाटकाची निवड झाली आहे. हे नाटक २२ सप्टेंबर २०२४ रोजी, सायंकाळी ७ वाजता स्टेन ऑडिटोरियम येथे सादर होणार आहे.

‘कलगीतुरा’ हे नाटक मराठी लोककलेचा अप्रतिम नमुना असून, नाटककार दया पाटील यांनी या नाटकाचे लेखन दहा वर्षांच्या संशोधनातून साकारले आहे. या संगीत नाटकाचे दिग्दर्शन सध्याचे आघाडीच्या नाट्य दिग्दर्शक सचिन शिंदे यांनी केले आहे. तब्बल २२ कलाकारांचा सहभाग असलेल्या या नाटकात हेमंत महाजन, विमल ननावरे, निलेश सूर्यवंशी, अर्णव इंगळे, आणि ऋषिकेश शेलार यांच्यासह नाशिक जिल्ह्यातील विविध भागांतील कलाकार भूमिका साकारत आहेत.

नाटकाचे संगीत ऋषिकेश शेलार यांनी दिले असून, रोहित सरोदे यांनी संगीत संयोजन केले आहे. प्रकाशयोजनेची जबाबदारी चेतन बावडेकर यांनी सांभाळली आहे. या नाटकाच्या माध्यमातून पारंपरिक ‘कलगी’ आणि ‘तुरा’ या लोकपरंपरेचा संघर्ष रंगमंचावर सादर होतो, जो अंधारात हरवलेल्या लोककलेचा पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न आहे.

‘कलगीतुराविषयी

‘कलगीतुरा’ हा महाराष्ट्रातील एक अत्यंत प्रसिद्ध लोककला परंपरा आहे. यामध्ये पारंपरिक लावण्यांचा प्रयोग केला जातो, ज्यामध्ये गावातील शेतकरी आणि लोक आपल्या गाण्याद्वारे सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीवर टिप्पणी करतात. ‘कलगीतुरा’ विशेषतः अत्यंत सुरस व मजेशीर असतो, ज्यामध्ये जीवनातील प्रतिकूल परिस्थितीला हास्य आणि विनोदाच्या माध्यमातून सामोरे जाता येते.

एनसीपीए मुंबईच्या ‘दपर्ण’ लेखन उपक्रमात विजेते ठरलेले हे नाटक आधीच मुंबई रंगभूमीवर खूप लोकप्रिय झाले आहे. दिग्दर्शक सचिन शिंदे आणि लेखक दत्ता पाटील यांची जोडी मराठी रंगभूमीवर यापूर्वीही अनेक गाजलेली नाटके सादर करून रसिकांची मने जिंकली आहेत.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *