जळगाव येथे महिला आयोगाच्या जनसुनावणीत ९४ प्रकरणांवर कार्यवाही

जळगाव, दि. १९ (जिमाका): महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या महिला आयोग आपल्या दारी उपक्रमांतर्गत नियोजन भवन येथे आज जनसुनावणी झाली. एकूण 94 प्रकरण दाखल झाली होती. तीन पॅनल कडून कार्यवाही करण्यात आली आहे.

आज जळगाव जिल्ह्याची जनसुनावणी आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी घेतली. जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे झालेल्या सुनावणीला जिल्हा पोलीस अधीक्षक माहेश्वरी रेड्डी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अंकित, महानगरपालिकेचे आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव सय्यद, जिल्हा महिला बालविकास अधिकारी वनिता सोनगत उपस्थित होते.

एकाचवेळी तीन पॅनल तयार करून आजच दाखल झालेल्या एकूण 94 प्रकरणांवर कार्यवाही करण्यात आली. कौटुंबिक छळ, पोलिसांकडून झालेले दुर्लक्ष, प्रशासकीय अडचणी अशा स्वरूपाच्या केसेस आज सुनावणीला आल्या होत्या.

त्यात वैवाहिक/कौटुंबिक समस्या-74, सामाजिक-7, मालमत्ता/आर्थिक/समस्या-3, इतर-10 असे एकूण 94 प्रकरणावर सुनावणी घेण्यात आली.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *