मुंबई, दि. २६ : जन्माष्टमीनिमित्त राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज जुहू येथील इस्कॉनच्या राधा रासबिहारी मंदिरात जाऊन भगवान कृष्णाचे दर्शन घेतले व आरती केली.
यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. जुहू इस्कॉन मंदिराचे अध्यक्ष ब्रजहरी दास, विभागीय सचिव देवकीनंदन दास, भक्ती वेदांत संस्थेचे संचालक रसराज दास व उपाध्यक्ष मुकुंद माधव दास उपस्थित होते.
०००