वाळवा, शिराळा तालुक्‍यातील काही ठराविक शाळेतील विद्यार्थ्यांना ३१ जुलै पासून पुढील आदेशापर्यंत सुट्टी  

सांगलीदि. 30, (जि. मा. का.) : सातारा व सांगली जिल्ह्यातील अनेक भागात झालेला पाऊस तसेच जिल्ह्यातील कृष्णा नदीवरील आयर्विन पूलाच्या ठिकाणची पाणी पातळी, कोयना व वारणा धरणाचा विसर्ग इत्यादी सर्व बाबी लक्षात घेता तसेच काही काही शाळामध्ये निवारा केंद्र स्थापन करण्यात आल्यामुळे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. राजा दयानिधी यांनी सांगली जिल्ह्यातील सांगली वाळवा व शिराळा तालुक्‍यातील खालील शाळामधील सर्व विद्यार्थ्यांना दिनांक 31 जुलै 2024 पासून पुढील आदेशापर्यंत सुट्टी  जाहीर केली आहे.

अ.क्र.
तालुका / मनपा क्षेत्र
गावाचे नाव
शाळेचे नाव

1.
वाळवा
भरतवाडी
जि.प.शाळा, अंगणवाडी, पूर्व प्राथमिक, हायस्कूल, महाविद्यालय

कणेगाव
जि.प.शाळा, अंगणवाडी, पूर्व प्राथमिक शाळा, हायस्कूल, महाविद्यालय

2.
शिराळा
सागाव
वारणा व्हॅली स्कूल, अंगणवाडी

तथापी या कालावधीत सर्व मुख्‍याध्‍यापक, शिक्षक, व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत / विद्यालयात /महाविद्यालयात उपस्थित राहून स्‍थानिक प्रशासनाच्‍या आदेशानुसार आपत्‍ती व्‍यवस्‍थापनाचे कामकाज करणेचे आहे. उर्वरित सर्व शाळा/अंगणवाड्या/विद्यालये/महाविद्यालये त्यांचे व्यवस्थापन नियमाप्रमाणे चालू ठेवू शकतील, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी जारी केले आहेत.

 00000

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *