मुंबई दि.२७ : – महावितरणने महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या (MERC) मान्यतेनंतर ऊर्जा मंत्रालय (MoP), भारत सरकारच्या (GoI) सुधारित वितरण क्षेत्र योजनेमध्ये (RDSS) वाहिन्यांचे विलगीकरण, वितरण हानी कमी करणे, वितरण प्रणालीचे सक्षमीकरण आणि स्मार्ट मीटरिंग (Smart Metering) यांसारखे कार्यक्रम हाती घेतले आहेत. यामुळे महाराष्ट्रातील ग्राहकांना विश्वासार्ह आणि दर्जेदार वीजपुरवठा होण्यास मदत होईल. या योजनेद्वारे सिस्टीम मीटरिंग अंतर्गत सबस्टेशनमधील सर्व फीडरवर तसेच वितरण रोहित्रांवर (Distribution Transformer) आणि सर्व सरकारी कार्यालयांमध्ये स्मार्ट मीटर बसविण्यात येत आहेत. सर्वसामान्य ग्राहकांना मात्र प्रीपेड स्मार्ट मीटर बसविण्यात येत नाहीत असे महावितरणने कळविले आहे.
Related Posts
मुंबई शहर जिल्ह्यातील विधानसभा निवडणूक कामकाजाचा केंद्रीय निवडणूक निरीक्षकांनी घेतला आढावा
मुंबई, दि. ३१ : भारत निवडणूक आयोगाने नियुक्त केलेल्या केंद्रीय निवडणूक निरीक्षकांनी आज मुंबई शहर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघातील निवडणूक विषयक…
जळकोट तालुक्यातील पीक नुकसानीची मंत्री संजय बनसोडे यांनी केली पाहणी
नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना; शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार लातूर, दि. १८ : जळकोट तालुक्यात अतिवृष्टीने झालेल्या…
शिये – बावडा तपासणी नाक्यावर स्थिर सर्वेक्षण पथकाच्या कारवाईत १५ लाख ६१ हजार जप्त
कोल्हापूर, दि. ०१ (जिमाका): विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अंतर्गत शिये- बावडा तपासणी नाक्यावर स्थिर सर्वेक्षण पथकाने (SST) दिनांक 31…