मुंबई दि.२७ : – महावितरणने महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या (MERC) मान्यतेनंतर ऊर्जा मंत्रालय (MoP), भारत सरकारच्या (GoI) सुधारित वितरण क्षेत्र योजनेमध्ये (RDSS) वाहिन्यांचे विलगीकरण, वितरण हानी कमी करणे, वितरण प्रणालीचे सक्षमीकरण आणि स्मार्ट मीटरिंग (Smart Metering) यांसारखे कार्यक्रम हाती घेतले आहेत. यामुळे महाराष्ट्रातील ग्राहकांना विश्वासार्ह आणि दर्जेदार वीजपुरवठा होण्यास मदत होईल. या योजनेद्वारे सिस्टीम मीटरिंग अंतर्गत सबस्टेशनमधील सर्व फीडरवर तसेच वितरण रोहित्रांवर (Distribution Transformer) आणि सर्व सरकारी कार्यालयांमध्ये स्मार्ट मीटर बसविण्यात येत आहेत. सर्वसामान्य ग्राहकांना मात्र प्रीपेड स्मार्ट मीटर बसविण्यात येत नाहीत असे महावितरणने कळविले आहे.
Related Posts
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री त्र्यंबकेश्वर मंदिरात घेतले दर्शन
नाशिक, दि. २३ मार्च : (जिमाका वृत्तसेवा) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे त्र्यंबकेश्वराची विधिवत…
सियान देशांमधील महिला उद्योजकांचे परस्पर सहकार्य कौतुकास्पद – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन
मुंबई, दि. २१: आसियान देशांमधून भारत भेटीवर आलेल्या महिला उद्योजिका फिक्की महिला आघाडीच्या सहकार्याने भारतातील उद्योगांशी करीत असलेले परस्पर सहकार्य कौतुकास्पद…
नगरपंचायतीच्या प्रशासकीय इमारतीमुळे तळा शहराच्या वैभवात भर – उपमुख्यमंत्री अजित पवार
रायगड/अलिबाग, दि. ५ (जिमाका): नगरपंचायतीची प्रस्तावित प्रशासकीय इमारत ही तळा शहराच्या वैभवात भर घालणारी, दर्जेदार आणि भविष्याचा विचार करून उभारण्यात…