सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्तालयात राष्ट्रीय एकता दिनाची शपथ

अमरावती, दि. 31 : भारताचे पहिले उपपंतप्रधान, गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्तालयात आज विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार करून अभिवादन केले. तसेच दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना राष्ट्रीय संकल्प दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेसही पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

भारतीय एकात्मतेसाठी निश्चियपूर्वक धोरण आखून त्यासाठी पावले उचलणाऱ्या सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येत असलेल्या राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विभागीय आयुक्तालयातील  अधिकारी, कर्मचारी यांना विभागीय आयुक्त डॉ. सिंघल यांनी राष्ट्रीय एकतेची शपथ दिली.

यावेळी उपायुक्त संतोष कवडे, राजीव फडके, सहाय्यक आयुक्त वैशाली पाथरे, तहसीलदार प्रज्ञा काकडे, नायब तहसीलदार श्याम देशमुख यांच्यासह अन्य अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *