विधानपरिषद लक्षवेधी

छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयास एम्स दर्जासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ

मुंबई,दि.२७ : छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व घाटी रुग्णालयास एम्स दर्जा मिळावा यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानपरिषदेत सांगितले.

सदस्य विक्रम काळे यांनी छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ,घाटी रुग्णालयास एम्स दर्जा मिळावा यासाठी लक्षवेधी सूचना मांडली होती. या लक्षवेधीला उत्तर देताना मंत्री श्री.मुश्रीफ बोलत होते.

केंद्र सरकारने 2026-27 च्या अर्थसंकल्पात एम्ससाठी  रु. 11,307 कोटींची तरतूद करून चार नवीन संस्था स्थापन करण्याचे धोरण जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्रीस्तरावरून केंद्राकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. या प्रस्तावाचा आपण पाठपुरावा करणार असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

अहिल्यानगर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी  तीन जागांची निवड करण्यात आली आहे. त्या संदर्भात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व मंत्री गिरीश महाजन यांची समिती लवकरच अंतिम निर्णय घेणार असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

राज्यातील काही शासकीय रुग्णालये एम्सच्या बरोबरीने सुविधा देत आहेत. त्यामुळे या रुग्णालयांना एम्स दर्जा मिळाल्यास केंद्राचा अधिक निधी उपलब्ध होईल, असेही मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले. चर्चेत सदस्य पाटील यांनीही सहभाग घेतला.

००००

राजू धोत्रे/विसंअ

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *