राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी घेतला डिजिटल शाळा व्यवस्थापन, शैक्षणिक संकुलांचा आढावा

मुंबई, दि. १३ : राज्यातील शैक्षणिक उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी, डिजिटल व्यवस्थापन आणि विद्यार्थीकेंद्रित योजनांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी मंत्रालयात आढावा बैठक घेतली.

या बैठकीत प्रस्तावित प्री- प्रायमरी स्कूल अॅक्ट, सर्व शाळांचे सेंट्रलाईज्ड डिजिटी डाटा मॅनेजमेंट, प्रधानमंत्री पोषण आहार योजना, बालभवन उपक्रम, प्रस्तावित पंजाबराव देशमुख शैक्षणिक संकुल, अमरावती तसेच कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय या विषयांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

यावेळी विविध योजनांच्या अंमलबजावणीतील प्रलंबित बाबी, आवश्यक सुविधा, डिजिटल व्यवस्थापन प्रणाली अधिक सक्षम करण्याबाबत चर्चा करण्यात आली. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, पोषण आहार व शैक्षणिक सुविधा प्रभावीपणे उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने कार्य करावे, अशा सूचना राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिल्या.

0000

मोहिनी राणे/विसंअ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *