राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनात अभिवादन

मुंबई, दि. 26 :  राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास विधान भवन येथे विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे व विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

 याप्रसंगी विधानमंडळ सचिवालयाचे सचिव जितेंद्र भोळे, सचिव श्रीमती मेघना तळेकर, सचिव शिवदर्शन साठ्ये, उप सचिव विजय कोमटवार, संचालक, वि.स.पागे, संसदीय प्रशिक्षण केंद्र आणि जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *