रत्नागिरी जिल्ह्यातील प्रदूषण नियंत्रणाबाबत बैठक

मुंबई, दि. ३ : रत्नागिरी जिल्ह्यातील प्रदूषण नियंत्रणाबाबत विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या दालनात बैठक झाली. बैठकीला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी निखील घरत, रवींद्र आंधळे आदींसह अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत प्रदूषण निर्माण करणाऱ्या घटकांबाबत चर्चा करण्यात आली. प्रदूषण करणाऱ्या घटकांची वर्गवारी करून त्यांच्यावर प्रदूषण कमी करण्यासाठी विविध उपाययोजना करण्याबाबत सक्ती करण्यात यावी. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या स्तरावर अशा घटकांबाबत उचित कार्यवाही करण्याच्या सूचना यावेळी उपाध्यक्ष श्री. बनसोडे यांनी दिल्या.

0000

नीलेश तायडे/विसंअ/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *