मुंबई, दि. २१ : योग ही भारतीय संस्कृतिची अमूल्य परंपरा असून शरीर, मन आणि आत्मा यांचा समतोल साधणारे प्रभावी माध्यम आहे. योगामुळे निरोगी, सकारात्मक आणि शिस्तबद्ध जीवन जगण्याची प्रेरणा मिळत असून प्रत्येकाने योगाचा समावेश आपल्या दैनंदिन जीवनात करावा, असे आवाहन केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांनी केले.
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मालाड पश्चिम येथील दाना-पानी बीचवर केंद्रीय मंत्री श्री. गोयल यांच्या उपस्थितीत सामूहिक योगाभ्यास कार्यक्रम पार पडला. या योगाभ्यास कार्यक्रमास विविध वयोगटांतील नागरिकांनी सहभाग घेतला.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारामुळे आज संपूर्ण जग भारताच्या या प्राचीन परंपरेचा स्वीकार करत आहे. योगाचा नियमित सराव करून निरोगी व सशक्त भारताच्या निर्मितीत प्रत्येक नागरिकाने योगदान द्यावे, असे आवाहनही केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी केले आहे.
00000