मुख्य सचिव राजेश कुमार यांना तीन महिने मुदतवाढ

मुंबई, दि. २९ : राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार यांना मुख्य सचिवपदावर तीन महिन्यांची मुदतवाढ मिळाली आहे. १ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर २०२५ या कालावधीसाठी ही मुदतवाढ असेल. याबाबतचे आदेश केंद्र सरकारकडून सामान्य प्रशासन विभागाला प्राप्त झाले आहेत.

राज्य शासनाने तीन महिने मुदतवाढ देऊन राज्याची ध्येय-धोरणे पुढे राबविण्याची संधी दिल्याबद्दल मुख्य सचिवांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्य शासनाचे आभार मानले आहेत.

०००

श्री.बी.सी.झंवर/विसंअ/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *