तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कारासाठी २० ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई, दि. ३ : तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार २०२५ साठी २० ऑगस्ट २०२६ पर्यंत केंद्र शासनाच्या https://awards.gov.in या पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन मुंबई शहरच्या जिल्हा क्रीडा अधिकारी नीलिमा अडसूळ यांनी केले आहे. साहसी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयातर्फे हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. या पुरस्कारांतर्गत जमिनीवरील, समुद्रावरील आणि हवाई साहसी उपक्रमांसाठी प्रत्येकी एक पुरस्कार दिला जातो. तसेच साहसी क्षेत्रातील आजीवन योगदान यासाठीही स्वतंत्र पुरस्कार प्रदान करण्यात येतो.

या पुरस्कारासाठी अर्ज करणाऱ्या साहसी खेळाडूंची कामगिरी २०२३, २०२४ आणि २०२५ या तीन वर्षांतील असणे आवश्यक आहे. तसेच संबंधित कामगिरी जमीन, पाणी किंवा हवाई साहसी उपक्रमांमधील असून ती अतिउत्कृष्ट स्वरूपाची असावी.

पुरस्कारासाठीची नामांकने २० ऑगस्ट २०२६ पर्यंत केवळ केंद्र शासनाच्या ऑनलाइन पोर्टलवर स्वीकारली जाणार असून, ऑफलाइन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. त्यामुळे पात्र साहसी खेळाडूंनी विहित मुदतीत ऑनलाइन अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

0000

श्रद्धा मेश्राम/विसंअ

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *