मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची छायाचित्रकार रघु राय यांना श्रद्धांजली

मुंबई, दि. २६ : छायाचित्रातून मानवी भावभावनाना टिपणारे आतरराष्ट्रीय छायाचित्रकार आणि छायापत्रकार रघु राय यांच्या निधनामुळे भारतीय पत्रकारितेच्या क्षेत्रातील एका दिग्गज व्यक्तिमत्वाला मुकलो आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोकसंदेशात नमूद केले आहे की, रघु राय यांनी कॅमेरातून भारताच्या विकासाची गाथा छायाचित्रबद्ध केली आहे. त्यांनी भारताचा इतिहास, भारतीय जनमानसाच्या भावना आणि भारतीयांच्या दैनंदिन जीवनातील घडामोडी यांना कॅमेरातून पकडले. भोपाळ वायू दुर्घटना पीडितांच्या वेदनांना त्यांनी छायाचित्राच्या माध्यमातून जगासमोर मांडले. त्यामुळेच भोपाळ वायू दुर्घटनेकडे जगाचे लक्ष वेधले गेले.

राय यांच्या अनेक कलाकृतींना आंतरराष्ट्रीय सन्मान मिळाले. त्यांनी छायाचित्राविषयी अनेक पुस्तके लिहिली. त्यांनी टाईम, लाईफ, द न्युयार्क टाईम्स आदी प्रकाशनासाठीही काम केले. त्यांना 1972 मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांना अनेक राष्ट्रीय आतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले.

त्यांनी वर्ल्ड प्रेस फोटो साठी ज्युरी म्हणून काम केले. युनेस्कोच्या आतरराष्ट्रीय फोटो स्पर्धेसाठीही काम केले. या माध्यमातून त्यांनी नवीन छायाचित्रकार घडविण्याचे कार्य केले. त्यांच्या ह्युमन मैनैजमेट आफ वाईल्डलाईफ इन इडिया या छायाचित्र प्रंबधाला अमेरिकेत फोटोग्राफर आफ द ईयर पुरस्कार मिळाला होता. फ्रेंच सरकारनेही त्यांना विशेष पुरस्कार देऊन गौरविले होते. सत्य, आर्तता आणि कारुण्य या शब्दात व्यक्त करण्यास अवघड असणाऱ्या क्षणांना त्यांनी आपल्या छायाचित्रातून टिपले. त्यांनी भारताच्या विकासाचे टिपलेले अनेक क्षण आधुनिक भारताचे चित्रमय दस्तावेज आहे, असे नमूद करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या छायापत्रकार रघू राय यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *