मुंबई दि. १५ : भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत उच्च न्यायालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी वंदे मातरम्, राष्ट्रगीत व राज्यगीताचे गायन करून पोलीस पथकाने राष्ट्रीय ध्वजास सलामी दिली. यावेळी श्रीमती अमृता फडणवीस तसेच मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, अधिकारी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
00000