मिरा भाईंदर शहरातील महसूल विभागाशी सबंधित विविध विषयांबाबत परिपूर्ण माहिती सादर करा – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई, दि. 25 : मिरा भाईंदर शहरातील महसूल विभागाशी सबंधित विविध विषयांवर मंत्रालयात बैठक घेतली जाईल यासंदर्भात आवश्यक परिपूर्ण माहिती सादर करावी, असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

मिरा-भाईंदर शहरातील महसूल विभागाशी संबंधित विविध प्रश्नांबाबत बैठक झाली. बैठकीस वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड आशिष जयस्वाल, आमदार नरेंद्र मेहता, महसूल विभागाचे सहसचिव सत्यनारायण बजाज, सहसचिव जायभाये उपस्थित होते. तसेच मीरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त राधा बिनोद शर्मा, ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ हे दूरदृश्य प्रणाली द्वारे बैठकीत सहभागी झाले होते.

भाईंदर येथील जुना सर्व्हे क्र. ६६३ (नवीन सर्वे क्र. २३७) या वर्ग-२ शासकीय जमिनीच्या संदर्भात सविस्तर आढावा घेताना मंत्री श्री बावनकुळे म्हणाले, शासकीय जमिनीवरील अवैध व्यावसायिक वापर करून शर्तभंग व नियमभंगबाबत संबंधित उपविभागीय अधिकारी यांनी सर्वे नंबरनिहाय माहिती सादर करावी.

00000

किरण वाघ/विसंअ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *