नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात डॉ. प्रवीण गेडाम यांच्या हस्ते ध्वजवंदन

नाशिक, दि. १ मे, : महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक येथे विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी पोलिस दलाच्या तुकडीने मानवंदना दिली.
यावेळी अपर आयुक्त जितेंद्र वाघ, अपर आयुक्त अरविंद लोखंडे, अपर आयुक्त अजय मोरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

विभागीय आयुक्त डाॅ गेडाम यांनी उपस्थितांना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. यावेळी पोलीस बॅन्ड पथकाने वंदे मातरम्, राष्ट्रगीत व राज्यगीताची धून वाजविली.

००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *