मुंबई, दि. 21 :- “रेडिओच्या आवाजाचा अनभिषिक्त सम्राट, ज्येष्ठ निवेदक अमिन सयानी यांच्या निधनाने भारतीय रेडिओच्या सांगीतिक इतिहासातील सोनेरी अध्याय संपला आहे. रेडिओ हेच माहिती व मनोरंजनाचे एकमेव साधन होते त्या काळात अमिन सयानी यांनी १९५२ ते १९९४ अशी तब्बल बेचाळीस वर्षे रेडिओवर गीतमाला सादर केली. त्यांच्या शैलीदार, रसाळ निवेदनाने रेडिओवरील गीतांची गोडी कैकपटीने वाढवली. संगीत रसिकांच्या कितीतरी पिढ्यांचे कान त्यांच्या निवेदनानं तृप्त केले. त्यांनी रेडिओवर घेतलेल्या गायक, गीतकार संगीतकारांच्या मुलाखती हा भारताच्या सांगीतिक वाटचालीचा अमूल्य ठेवा आहे. त्यांच्यासारखा निवेदक भारतीय रेडिओवर असणं आणि त्याचा आवाज ऐकायला मिळणं, हा अवर्णनीय आनंद होता. त्यांचं निधन ही भारतीय कला, सांस्कृतिक क्षेत्राची कधीही भरुन न निघणारी हानी आहे. मी अमिन सयानी साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ निवेदक अमिन सयानी यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.
Related Posts
स्वित्झर्लंडच्या उद्योजकांचे महाराष्ट्रात स्वागत – मंत्री जयकुमार रावल
मुंबई, दि. ११ : महाराष्ट्र हे देशातील मोठ्या प्रमाणावरील कृषी माल उत्पादक राज्य आहे. येथे अन्न प्रक्रिया उद्योग क्षेत्रासह विविध…
लोकसभा निवडणूकसंदर्भात नोडल अधिकारी यांचा घेतला आढावा
अमरावती, दि. 20 (जिमाका): लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नोडल अधिकारी म्हणून निवडणूकीच्या विविध टप्प्यांवर जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. प्रत्येक नोडल…
एमएमआरडीएने आकारलेले विस्तारित शुल्क रद्द करून भाडे दर कमी करावा – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे
मुंबई, दि. ४ – वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) येथे महाराष्ट्र सागरी मंडळाच्या प्रस्तावित कार्यालयीन इमारतीच्या बांधकामासंदर्भात एमएमआरडीएने आकारलेले विस्तारित शुल्क रद्द करून…