जिल्हा क्रीडा संकुलातील विविध विकास कामांसाठीच्या निविदा तात्काळ काढा – पालकमंत्री चंद्रकांत पाटील    

सांगली दि. २४ (जिमाका) : जिल्हा क्रीडा संकुलातील विविध क्रीडा विषयक सोयी सुविधांच्या निविदा तात्काळ काढून कामे मार्गी लावावीत, अशा सूचना राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक सभागृहात आयोजित जिल्हा क्रीडा संकुल समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, पालकमंत्री महोदय यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव, जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता क्रांतीकुमार मिरजकर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजेसाहेब लोंढे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मोहन गायकवाड आदी उपस्थित होते.

बॅडमिंटन कोर्ट भाडेतत्त्वावर देणे, 400 मीटर सिंथेटिक धावणमार्ग व नैसर्गिक गवताचे फुटबॉल मैदानाच्या कामाबाबत निविदा प्रसिद्ध करणे, लॉन टेनिस कोर्टवर पिकल बॉल कोर्ट निर्माण करणे, जलतरण तलाव भाडेतत्त्वावर देण्यासाठी टेंडर प्रक्रिया राबवणे, क्रीडा अधिकारी कार्यालयासाठी बाह्य स्त्रोत कर्मचारी नियुक्त करणे, लॉन टेनिस कोर्ट जवळील स्वच्छतागृह दुरुस्त करणे, सोलर सिस्टिम देखभालीसाठी एजन्सी नियुक्त करणे, क्रीडांगण विकास व व्यायाम शाळा विकास अनुदान योजनेअंतर्गत प्रस्ताव सादर करणे आदी कामांबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. ही कामे मार्गी लावण्यासाठी तात्काळ आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिल्या दिल्या.        

0000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *