मुंबई दि.७: कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई उपनगर जिल्ह्यातील उमेदवारांना, इस्रायल येथे रोजगाराची संधी उपलब्ध असल्याची माहिती मुंबई उपनगरचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजक्ता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त शैलेश भगत यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
इंग्रजी भाषेचे सामान्य ज्ञान असणाऱ्या वय वर्षे २५ ते ४५ वयोगटाचे उमेदवार या योजनेमध्ये सहभागी होण्यास पात्र आहेत. उमेदवारांकडे काळजीवाहू (घरगुती सहायक) सेवांसाठी निपुण/पारंगत, भारतातील नियामक प्राधिकरणाव्दारे मान्यताप्राप्त असलेले व किमान ९९० तासांचा कोर्स पूर्ण केलेले प्रमाणपत्र असणे आवश्यक (इन्क्लुडिंग आजीटी) भारतीय प्राधिकरणाव्दारे प्रदान केलेल्या मिडवायफरी मधील प्रशिक्षण, संबंधित भारतीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली किंवा नर्सिंग, फिजिओथेरपी, नर्स असिस्टंट मधील प्रशिक्षण पूर्ण असणे आवश्यक आहे. जीडीए/ एएनएम/ जीएनएम/ बीएससी नर्सिंग/ पोस्ट बीएससी नर्सिंग शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे. वरील संधीचा लाभ घेण्यासाठी तसेच अधिक माहिती लाभ व नोंदणीसाठी www.maharashtrainternational.com या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी असे आवाहन सहायक आयुक्त शैलेश भगत, यांनी केले आहे.
0000
संध्या गरवारे/विसंअ