कारागृहातील बंदीजनांकडून निर्मित वस्तूंच्या मंत्रालयातील विक्री व प्रदर्शनाला गृह राज्यमंत्री योगेश कदम यांची भेट

मुंबईदि. १२ मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात आयोजित कारागृहातील बंदीजनांकडून निर्मित वस्तूंच्या विक्री व प्रदर्शनाला गृह राज्यमंत्री (शहरे) योगेश कदम यांनी भेट दिली. यावेळी प्रदर्शनातील प्रत्येक स्टॉलला भेट देत अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

दरम्यानकाही वस्तूंची खरेदीही राज्यमंत्री श्री. कदम यांनी केली. प्रदर्शनातील निर्मित वस्तू दर्जेदार व दैनंदिन उपयोगात येणाऱ्या असल्याने बंदीजनांचे राज्यमंत्री श्री. कदम यांनी यावेळी कौतुक केले. येरवडा कारागृह पुणेछत्रपती संभाजीनगरनागपूरअमरावतीकोल्हापूरनाशिक रोड या कारागृहांमध्ये निर्मित वस्तूंचा या स्टॉलमध्ये समावेश आहे. 

यावेळी गृह विभागाच्या प्रधान सचिव राधिका रस्तोगीपोलिस उप महानिरीक्षक योगेश देसाईअधीक्षक राणी भोसले आदी उपस्थित होते.

00000

नीलेश तायडे/विसंअ/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *