कामठी,  छाचेर आणि रेवराळ स्थानकांवरील यात्रेकरूंच्या सुविधांकडे लक्ष द्या – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे 

नागपूर,दि. 29 : जिल्ह्यातील कामठी, छाचेर आणि रेवराल या स्थानकांवरील सुविधांकडे रेल्वे विभागाने लक्ष द्यावे. विशेषतः यात्रेकरूंच्या सुविधा काटेकोर असाव्यात याकडे लक्ष देण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज येथे दिले.

सदर येथील जिल्हा नियोजन भवन येथे आज जिल्ह्यातील दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या विकास कामांच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार कृष्णा खोपडे, आमदार चरणसिंह ठाकूर, जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती संजय मीना, दक्षिण पूर्व मध्य रेलवे डीआरएम दीपक कुमार गुप्ता, वरिष्ठ डीसीएम दिलीप सिंह, सीएमपी अशोक सुर्यवंशी, वरिष्ठ अभियंता अंकित यदुवंशी यांच्यासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

रेल्वे विभागाकडून जिल्ह्यात समाधानकारक काम सुरू आहेत. अनेक कामे रेल्वे विभागाकडून सुरू आहेत. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत असलेल्या कामठी, छाचेर आणि रेवराळ या स्थानकांवरील यात्रेकरूंच्या सुविधांकडे लक्ष देण्यात यावे. खात येथील रेल्वे फाटकांची समस्या, कामठी आरओबी उभारणे यासह अमृत भारत स्टेशन योजना यावर या बैठकीत चर्चा करण्यात आली.

***

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *