उजनी येथे पुरामुळे झालेल्या नुकसानीची पालकमंत्री शिवेंद्रसिंह भोसले यांच्याकडून पाहणी

लातूर, दि. १८ : तेरणा नदीला आलेल्या पुराने उजनी येथील शेतपिके, घरांचे आणि रस्त्यांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीची राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंह भोसले यांनी पाहणी केली. पुराच्या पाण्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत. तसेच तेरणा नदीवर उजनी गावाजवळ पूल उभारण्यासाठी प्रस्ताव सादर करावा, असा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

यावेळी औसा-रेणापूरचे उपविभागीय अधिकारी अविनाश कोरडे, तहसीलदार घनश्याम अडसूळ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता देवेंद्र नीलकंठ, उपअभियंता रोहन जाधव यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

नदीला आलेल्या पुरामुळे शेतीचे झालेले नुकसान, नदीकाठावरील घरात पाणी जावून झालेली पडझड, रस्त्यांचे नुकसान आदींची पालकमंत्री भोसले यांनी पाहणी केली. तसेच याठिकाणी उपस्थित ग्रामस्थ, शेतकरी यांच्याकडून नुकसानीची माहिती जाणून घेतली. तसेच उजनी गावाजवळ तेरणा नदीवर पूल उभारण्यासाठी नाबार्डकडे प्रस्ताव पाठवावा. तसेच महामार्गाच्या पुलाची वाढविण्याचे काम लवकरात लवकर सुरु करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *