मुंबई, दि. 29 :- “आयसीसी टी-ट्वेंटी विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचे कौतुक करायला शब्द अपुरे आहेत. तब्बल सतरा वर्षांनंतर भारतीय क्रिकेट संघाने टी-ट्वेंटी वर्ल्डकप जिंकून देशवासियांना दिलेला आनंद अवर्णनीय आहे. संपूर्ण देश या विजयाने भारावून गेला आहे. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने केलेली कामगिरी जगज्जेत्यासारखीच आहे. विराट कोहली, अक्षर पटेल, शिवम दुबे यांनी दमदार पण संयमी खेळी करुन सर्वाधिक धावांचा विक्रम रचला. सूर्यकुमार यादवचा झेल, जसप्रीत बुमराहची गोलंदाजी हे सारंच अविस्मरणीय होतं. संघातल्या प्रत्येक खेळाडूचं योगदान, समस्त देशवासियांच्या शुभेच्छांमुळेच हे यश मिळालं आहे. भारतीय क्रिकेट संघाचं हे यश देशातील क्रिकेटसह देशातील अन्य खेळांना संजीवनी तसेच खेळाडूंना प्रेरणा देईल. आयसीसी टी-ट्वेंटी विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचे मी मनापासून अभिनंदन करतो,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन केले आहे.
Related Posts
नाशिक-मुंबई महामार्गावरील रस्त्यांची कामे जलदगतीने पूर्ण करावीत : पालकमंत्री दादाजी भुसे
नाशिक, दिनांक 1 ऑगस्ट, 2024 (जि. मा. का. वृत्तसेवा): नाशिक- मुंबई महामार्गावरील रस्त्यांच्या कामांसह इतर अनुषंगिक कामे तातडीने पूर्ण करण्याबाबत…
जीवामृत हेच नैसर्गिक शेतीचे ‘अमृत’ – राज्यपाल आचार्य देवव्रत
नाशिक, दि. २ (जिमाका वृत्तसेवा): रासायनिक खते, कीटकनाशकांच्या अतीवापरामुळे नापीक झालेली जमीन सुपीक करावयाची असेल, तर आपल्याला नैसर्गिक शेतीकडे वळावे…
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या रुग्णांचे स्वागत ‘वेलकम किट’ ने करावे – मंत्री प्रकाश आबिटकर
मुंबई, दि. १७ : महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या…