मुंबई, दि. 29 :- “आयसीसी टी-ट्वेंटी विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचे कौतुक करायला शब्द अपुरे आहेत. तब्बल सतरा वर्षांनंतर भारतीय क्रिकेट संघाने टी-ट्वेंटी वर्ल्डकप जिंकून देशवासियांना दिलेला आनंद अवर्णनीय आहे. संपूर्ण देश या विजयाने भारावून गेला आहे. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने केलेली कामगिरी जगज्जेत्यासारखीच आहे. विराट कोहली, अक्षर पटेल, शिवम दुबे यांनी दमदार पण संयमी खेळी करुन सर्वाधिक धावांचा विक्रम रचला. सूर्यकुमार यादवचा झेल, जसप्रीत बुमराहची गोलंदाजी हे सारंच अविस्मरणीय होतं. संघातल्या प्रत्येक खेळाडूचं योगदान, समस्त देशवासियांच्या शुभेच्छांमुळेच हे यश मिळालं आहे. भारतीय क्रिकेट संघाचं हे यश देशातील क्रिकेटसह देशातील अन्य खेळांना संजीवनी तसेच खेळाडूंना प्रेरणा देईल. आयसीसी टी-ट्वेंटी विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचे मी मनापासून अभिनंदन करतो,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन केले आहे.
Related Posts
मतदारांनो जिंका मोटारसायकल, रेसिंग सायकल आणि मोबाईल
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने आकर्षक स्पर्धा चंद्रपूर, दि. ११ : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी, सर्व स्तरातील, वयोगटातील मतदारांनी अधिकाधिक संख्येने…
निवडणूक खर्चासाठी उमेदवाराचे स्वतंत्र बँक खाते आवश्यक
मुंबई, दि. ०२ : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करिता भारत निवडणूक आयोग यांनी खर्चविषयक सूचना सारसंग्रह २०२४ मध्ये निर्देश दिल्यानुसार…
प्रवासी व एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना उत्तम सोयीसुविधा देण्यासाठी कटिबद्ध – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
ठाणे, दि.11 (जिमाका) :- आज ठाण्यातील खोपट बसस्थानकात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आयोजित राष्ट्रीय रस्ता सुरक्षित महिना 2025 चे…