‘आपलं मंत्रालय’ अंकाचे प्रकाशन सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी  डॉ. राजेश गवांदे यांच्या हस्ते झाले

मुंबई, दि. ४: महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित होणाऱ्या ‘आपलं मंत्रालय’ या गृहपत्रिकेच्या एप्रिल २०२६ या अंकाचे प्रकाशन सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी तथा अतिथी संपादक डॉ. राजेश गवांदे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव (मावज) अजय भोसले, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक डॉ. किशोर गांगुर्डे, प्रधान सचिव तथा महासंचालक यांचे विशेष कार्यअधिकारी इर्शाद बागवान उपस्थित होते.

‘आपलं मंत्रालय’ या गृहपत्रिकेच्या या अंकामध्ये विविध विषयांचा समतोल आणि आशयपूर्ण आढावा घेण्यात आला आहे. राजशिष्टाचार उपविभागाचा विस्तार केल्यामुळे राज्याच्या आर्थिक विकास व रोजगार निर्मितीला गती मिळणार आहे याची माहिती देण्यात आली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) या समकालीन विषयावरील लेखांच्या माध्यमातून विज्ञान व तंत्रज्ञानातील नव्या घडामोडींची माहिती वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या अंकात करण्यात आला आहे. शासन व्यवस्थेतील महसूली संकल्पना असो किंवा बदलत्या काळातील महिला आणि डिजिटल सुरक्षेचा प्रश्न असो अशा विविध विषयाची मांडणी या अंकात करण्यात आलेली आहे.

मंत्रालयातील विविध विभागांतील अधिकारी व कर्मचारी यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे आणि त्यांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने अंक प्रकाशित करण्यात येतो.

००००

अश्विनी पुजारी/स.सं.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *