मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्या सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ

नागपूर दि. ७: देशाच्या संरक्षणासाठी आपल्या प्राणाची बाजी लावून वेळप्रसंगी बलिदान देणाऱ्या सैनिकांच्या कल्याणासाठी सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन केला जातो. यावर्षीच्या सशस्त्र सेना ध्वजनिधी संकलनाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवार दि. 8 डिसेंबर रोजी सकाळी 9.30 वाजता होणार आहे.

मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान रामगिरी येथे हा कार्यक्रम होणार आहे. नागपूर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीने आयोजित या विशेष कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पर्यटन व खनिकर्म मंत्री शंभुराज देसाई, वित्त व नियोजन राज्यमंत्री अॅड. आशीष जयस्वाल यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

नागपूरच्या विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती असेल, अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर आनंद पाथरकर यांनी दिली.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *