पॅराग्वे प्रजासत्ताकचे अध्यक्ष सँटियागो पेना यांचे मुंबई येथे आगमन

मुंबई, दि. 3 : पॅराग्वे प्रजासत्ताकचे अध्यक्ष सँटियागो पेना यांचे त्यांच्या शिष्टमंडळासमवेत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे विशेष विमानाने आगमन  झाले.

राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी पॅराग्वेतील भारतीय राजदूत पियुष सिंह, प्रधान सचिव अंशु सिन्हा, सह पोलीस आयुक्त सत्यनारायण, सचिव संजय दशपुते, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार आदी मान्यवर उपस्थित होते.

पॅराग्वेचे अध्यक्ष यांनी शिष्टमंडळासमवेत हॉटेल ताज महल येथे प्रयाण केले. यावेळी मान्यवरांनी त्यांचे हॉटेल ताज महल येथेही पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *