सांगली, दि. २४ (जिमाका) : महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवडा २०२६” अंतर्गत आज दहाव्या दिवशी जलदौड काढण्यात आली. सांगली पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे यांचे मार्गदर्शन व नेतृत्वाखाली जलसंपदा विभागाचे सर्व कार्यकारी अभियंता, अधिकारी व कर्मचारी यांनी ३ किमी दौड पूर्ण करून जलव्यवस्थापन व निरंतर महाराष्ट्राचा संकल्प जलसंवर्धनाचा याचा संदेश दिला. या उपक्रमाद्वारे पाणी संवर्धन व योग्य जलनियोजनाबाबत जनजागृती करण्याचा उद्देश साध्य करण्यात आला.
या जलदौडमध्ये उपअधीक्षक अभियंता अमर सूर्यवंशी, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता ज्योती देवकर, रोहित कोरे, अभिनंदन हारूगडे, के. एल. मासाळ, हर्षद यादव, काशिनाथ मासाळ आणि राजन डवरी आदिसह जलसंपदा विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.