महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची ‘दिलखुलास’ कार्यक्रमात २३ व २४ जुलै तर ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात २४ जुलैला विशेष मुलाखत

मुंबई, दि. 22 : महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी आर्थिक सक्षमीकरणावर विशेष भर देण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’ ही महिलांसाठी अतिशय उपयुक्त ठरणार असल्याचे महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात सांगितले.

महिला सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहेत. त्यांना आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम व स्वावलंबी करण्यावर भर देण्यात येत असल्याची माहिती तसेच ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घेण्यासाठी  आवश्यक पात्रता, याबाबतची प्रक्रिया यासंदर्भातील सविस्तर माहिती, महिला व बाल विकास मंत्री कु. तटकरे यांनी ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातील  मुलाखतीत दिली आहे.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत, मंगळवार दि. 23, बुधवार दि.24 जुलै 2024 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲप वर प्रसारित होणार आहे. तर ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून ही मुलाखत बुधवार दि. 24 जुलै 2024 रोजी सायंकाळी 7.30 वाजता महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर पाहता येणार आहे. निवेदक राजेंद्र हुंजे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक

एक्स- https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

यूट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

0000

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *