मुंबई, दि. 29 :- “आयसीसी टी-ट्वेंटी विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचे कौतुक करायला शब्द अपुरे आहेत. तब्बल सतरा वर्षांनंतर भारतीय क्रिकेट संघाने टी-ट्वेंटी वर्ल्डकप जिंकून देशवासियांना दिलेला आनंद अवर्णनीय आहे. संपूर्ण देश या विजयाने भारावून गेला आहे. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने केलेली कामगिरी जगज्जेत्यासारखीच आहे. विराट कोहली, अक्षर पटेल, शिवम दुबे यांनी दमदार पण संयमी खेळी करुन सर्वाधिक धावांचा विक्रम रचला. सूर्यकुमार यादवचा झेल, जसप्रीत बुमराहची गोलंदाजी हे सारंच अविस्मरणीय होतं. संघातल्या प्रत्येक खेळाडूचं योगदान, समस्त देशवासियांच्या शुभेच्छांमुळेच हे यश मिळालं आहे. भारतीय क्रिकेट संघाचं हे यश देशातील क्रिकेटसह देशातील अन्य खेळांना संजीवनी तसेच खेळाडूंना प्रेरणा देईल. आयसीसी टी-ट्वेंटी विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचे मी मनापासून अभिनंदन करतो,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन केले आहे.
Related Posts
नवीन शाळांना मान्यता व विद्यमान शाळांच्या दर्जावाढ प्रस्तावाची छाननी यादी प्रसिद्ध
मुंबई, दि. ०७: महाराष्ट्र स्वयंअर्थसहाय्यित शाळा (स्थापना व विनियमन) अधिनियम , २०१२ अंतर्गत नवीन शाळांना मान्यता व विद्यमान शाळांचे दर्जावाढ…
मतदान केंद्रांवर पुरविण्यात येणाऱ्या सुविधांबाबत सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सूक्ष्म नियोजन करावे – जिल्हाधिकारी संजय यादव
मुंबई, दि. १२ : लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी मुंबई जिल्हा प्रशासनाची मा. भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानुसार अंमलबजावणी सुरु आहे. मा.भारत…
ठिबक व तुषार सिंचन प्रणालीबाबत शेतकऱ्यांना प्रशिक्षण आवश्यक – कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे
मुंबई, दि. 2 : ठिबक व तुषार सिंचन संचाचे वितरण करताना त्याची पूर्ण माहिती शेतकऱ्यांना देणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना ही प्रणाली…