मुंबई, दि. 29 :- “आयसीसी टी-ट्वेंटी विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचे कौतुक करायला शब्द अपुरे आहेत. तब्बल सतरा वर्षांनंतर भारतीय क्रिकेट संघाने टी-ट्वेंटी वर्ल्डकप जिंकून देशवासियांना दिलेला आनंद अवर्णनीय आहे. संपूर्ण देश या विजयाने भारावून गेला आहे. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने केलेली कामगिरी जगज्जेत्यासारखीच आहे. विराट कोहली, अक्षर पटेल, शिवम दुबे यांनी दमदार पण संयमी खेळी करुन सर्वाधिक धावांचा विक्रम रचला. सूर्यकुमार यादवचा झेल, जसप्रीत बुमराहची गोलंदाजी हे सारंच अविस्मरणीय होतं. संघातल्या प्रत्येक खेळाडूचं योगदान, समस्त देशवासियांच्या शुभेच्छांमुळेच हे यश मिळालं आहे. भारतीय क्रिकेट संघाचं हे यश देशातील क्रिकेटसह देशातील अन्य खेळांना संजीवनी तसेच खेळाडूंना प्रेरणा देईल. आयसीसी टी-ट्वेंटी विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचे मी मनापासून अभिनंदन करतो,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन केले आहे.
Related Posts
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना राबविताना पारदर्शकता ठेवा -पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे
प्राप्त ४ लाख ५९ हजार ८२७ अर्जापैकी ४ लाख २४ हजार २११ अर्जांना मान्यता प्राप्त सर्व अर्ज तात्काळ निकाली काढा…
मतदार साहाय्यता क्रमांकावरून मतदारांच्या शंकांचे निरसन
मुंबई दि.20: भारत निवडणूक आयोगाच्या १८००२२१९५० मतदार साहाय्यता क्रमांकावर दिनांक १८ एप्रिल २०२४ पर्यंत ७३१२ इतके फोन आलेले आहेत. सर्व फोन कॉल्सना…
कृत्रिम बुध्दिमत्ता आणि पत्रकारिता या विषयावर प्रधान सचिव ब्रिजेश सिंह यांचे उद्या व्याख्यान
नागपूर, दि. १७ : कृत्रिम बुध्दिमत्ता आणि पत्रकारिता या विषयावर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांचे…