मुंबई, दि. 29 :- “आयसीसी टी-ट्वेंटी विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचे कौतुक करायला शब्द अपुरे आहेत. तब्बल सतरा वर्षांनंतर भारतीय क्रिकेट संघाने टी-ट्वेंटी वर्ल्डकप जिंकून देशवासियांना दिलेला आनंद अवर्णनीय आहे. संपूर्ण देश या विजयाने भारावून गेला आहे. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने केलेली कामगिरी जगज्जेत्यासारखीच आहे. विराट कोहली, अक्षर पटेल, शिवम दुबे यांनी दमदार पण संयमी खेळी करुन सर्वाधिक धावांचा विक्रम रचला. सूर्यकुमार यादवचा झेल, जसप्रीत बुमराहची गोलंदाजी हे सारंच अविस्मरणीय होतं. संघातल्या प्रत्येक खेळाडूचं योगदान, समस्त देशवासियांच्या शुभेच्छांमुळेच हे यश मिळालं आहे. भारतीय क्रिकेट संघाचं हे यश देशातील क्रिकेटसह देशातील अन्य खेळांना संजीवनी तसेच खेळाडूंना प्रेरणा देईल. आयसीसी टी-ट्वेंटी विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचे मी मनापासून अभिनंदन करतो,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन केले आहे.
Related Posts
शहापूर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पामार्फत मतदानाचा टक्का वाढीसाठी जनजागृती
ठाणे,दि. 16 (जिमाका ) – मतदान हे प्रत्येकाचे राष्ट्रीय कर्तव्य असून मतदानाचा अधिकार हा प्रत्येक नागरिकांनी बजावावा. आपले मत अमूल्य असून मतदान करुन…
वृक्ष लागवड आणि संपूर्ण स्वच्छता मोहिम युद्धपातळीवर राबवा -विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार
सातारा दि. १५ : निसर्गाची अनिश्चितता संपवायची असेल तर मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेवून ग्रीन इम्पॅक्ट तयार करा.…
‘मिशन डिस्टिंक्शन’साठी धावले नागपूरकर !
मतदार जागृती दौड उत्साहात नागपूर, दि. 15 : जिल्हा निवडणूक विभागाने लोकसभा निवडणुकीत 75 टक्क्यांवर मतदानाचे ध्येय ठेवले आहे. यासाठी विविध…