मुंबई शिक्षक विधानपरिषद मतदारसंघात १३३१४ मतदार; २६ मतदान केंद्र

मुंबई दि 15:- भारत निवडणूक आयोगाने  अधिसूचनेद्वारे मुंबई पदवीधर व मुंबई शिक्षक मतदारसंघाचा द्विवार्षिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यात मुंबई शिक्षक विधानपरिषद मतदारसंघात 3442 – पुरुष मतदार, 9872 – महिला मतदार, असे एकूण 13314 – मतदार आहेत. मुंबई शिक्षक विधानपरिषद मतदारसंघासाठी सहा. मतदान केंद्रासह 26- मतदान केंद्र आहेत.

मुंबई शिक्षक विधानपरिषद मतदारसंघासाठी 29 – मतदान केंद्राध्यक्ष, 29- प्रथम मतदान अधिकारी (PRO), 58 – इतर मतदान अधिकारी, 29 – शिपाई असे एकूण 145  अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *