मुंबई, दि. २२ : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनास आज प्रारंभ झाला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा सभागृहास परिचय करून दिला.
नवनिर्वाचित सदस्यांमध्ये डॉ. नीलम गोऱ्हे, ओमप्रकाश ऊर्फ बच्चू बाबाराव कडू, अंबादास एकनाथराव दानवे, डॉ. प्रज्ञा राजीव सातव, प्रमोद शांताराम जठार, झीशान झिआउद्दीन सिद्दीकी, माधवी संजय नाईक, सुनिल विनायक कर्जतकर, विवेक बिपिनदादा कोल्हे आणि संजय नथ्थुजी भेंडे यांचा समावेश आहे. मुख्यमंत्र्यांनी या सर्व सदस्यांचे सभागृहात स्वागत करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
०००
मोहिनी राणे/स.सं.