सर्व मतदारांनी ‘मी मतदान करणार’ प्रतिज्ञा प्रमाणपत्र प्राप्त करा

बीड, दि.२ (जिमाका): ‘मी मतदान करणार’ असे प्रतिज्ञा प्रमाणपत्र प्राप्त करण्याची संधी सर्व मतदारांना प्राप्त करण्याची तयारी जिल्हा निवडणूक अधिकारी दीपा मुधोळ – मुंडे यांनी केली आहे. याचा लाभ मतदारांनी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्हा प्रशासनाकडून 1) https://forms.gle/rCWv3M3Q1q8akfjn8 2) https://forms.gle/wAgnuMArTn1YFRxz7 अशा दोन लिंक उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

दि. 28 एप्रिल रोजी ‘मी मतदान करणार’ असे प्रतिज्ञा प्रमाणपत्र प्राप्त करण्याच्या विशेष उपक्रमाच्या लिंकचे उद्घाटन जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमास प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याने दैनिक मर्यादा लवकरच संपत होती त्यामुळे आणखी पर्यायी एक लिंक उपलब्ध करून दिलेली आहे. त्या माध्यमातून आपल्या मेलवर प्रमाणपत्र मिळेल.

लिंक मध्ये ईमेल आयडी अचूक भरावा म्हणजे ई-मेल आयडीवर आपले प्रमाणपत्र प्राप्त होईल. जर दोन्ही लिंक ओपन झाल्या नाही तर दुसऱ्या दिवशी दोन्ही पैकी एका लिंकवर आपली माहिती भरावी व प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे आणि हे प्रमाणपत्र डाऊनलोड करून घ्यावे व आपल्या व्हाट्सअप स्टेटसला व सोशल मीडियावर ठेवावे. असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *