मुंबई, दि. ३० : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून लातूरच्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर – घुगे यांची ‘लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -२०२४ लातूर जिल्हा प्रशासन सज्ज’ या विषयावर मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत बुधवार दि. १ मे २०२४ आणि गुरुवार दि. २ मे
२०२४ रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरुन तसेच न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवरुन सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित करण्यात येणार आहे. लातूरच्या जिल्हा पुरवठा अधिकारी प्रियांका आयरे यांनी ही मुलाखत घेतली आहे.
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने लातूर जिल्ह्यात निवडणुकीचे कामकाज पार पाडण्यासाठी सुरु असलेली कार्यवाही. मतदान केद्रे व मतमोजणी केंद्रावर करण्यात आलेली तयारी, मतदार जनजागृती, कायदा व सुव्यवस्थेचे नियोजन, मतदारांसाठी सोयीसुविधा आदींबाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर – घुगे यांनी माहिती दिली आहे. तर ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत बुधवार दि. १ मे रोजी सायंकाळी ७.३० वाजता महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर पाहता येणार आहे. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक
एक्स- https://twitter.com/MahaDGIPR
फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR
यूट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
०००